गोंदी पोलीसाकंडून वाळूमाफीयांवर कारवाई ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त
जाफ्राबाद जालना प्रतिनिधी : मुरलीधर डहाके
अंबड तालुक्यातील पोलीस ठाणे गोंदी हद्दीतील आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहीती मिळाल्याने कर्तव्यावर हजर असलेले पोहेकों फुलचंद हजारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप हावाले व चालक पोकों वैद्य यांना माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी त्यांनी जाउन अवैधरित्या वाळू उपसा करीत असलेले, ट्रक वं ट्रैक्टर हे त्यांना पाहूण पळून जात असताना पोहेकों फुलचंद हजारे पोकों प्रदीप हावाले यांनी त्यातील एक ट्रॅक्टर व एक ट्रक पकडले व एक लोडर व एक मारोती स्वीप्ट कार चे चालक लोडर व कार घेवुन पळून गेले. ट्रॅक्टर वरील चालक प्रकाश ऊर्फ पप्यु भगवान भालेकर रा. आपेगाव व ट्रक चालक नामे सोमनाथ चांगदेव कोहक रा. शेवगाव ता. शेवगाव जिल्हा अहिल्यनगर यास ताब्यात घेतला त्यानंतर अधिक तपास करीता आरोपी मनोज कल्यान नाटकर रा. गेवराई (फरार), मंगेश ऊर्फ सोन्या पिता माउली चौधरी रा.आपेगाव (फरार), सोमनाथ चांगदेव कोहक, प्रकाश ऊर्फ पप्पू भगवान भालेकर असे मिळून लोडरच्या साहयाने गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करीत असल्याची माहीती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस स्टेशन गोंदी येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदर कारवाई दरम्यान पोलीसांनी एक ट्रॅक्टर, एक ट्रक, असा एकुन ३५,००,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात असून एक लोडर व एक मारोती स्वीप्ट कार चे चालक हे लोडर व कार घेवुन पळून गेले आरोपीना अटक करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक, श्री अजयकुमार बंसल साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक, आयुष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड, श्री विशाल खांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक, आशिष खांडेकर, पोहेकों फुलचंद हजारे, पोकों प्रदिप हावाले, दिपक भोजणे, शाके रोद्दीन सिद्दीकी, सलमान सय्यद, अब्दुल वहाब शेख चालक पोलीस कॉन्स्टेबल’ वैद्य सर्व पोलीस ठाणे गोंदी यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस सहायक पोलीस फौजदार कंटुले हे करीत आहेत.













