ट्रॅक्टर- दुचाकी अपघात ऊसतोड कामगाराचा मृत्यू
गंगाखेड तालुक्यातील महातपुरी फाटा जवळ अपघात *ट्रॅक्टर चालकाने काढला पळ
गंगाखेड तालुका प्रतिनिधी चव्हाण युवराज
गंगाखेड. ट्रॅक्टर दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात 26 वर्षी ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 10 वाजेच्या सुमारास महातपुरी फाट्यापासून जवळच भांबरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
महातपुरी फाटा येथून दुचाकी वर उसाच्या फडात जाण्यासाठी निघालेल्या ऊसतोड कामगार बाळू काशिनाथ राठोड (वय 26 वर्ष रा. पोहडुळ तांडा ता. सोनपेठ) याच्या दुचाकी वर व ट्रॅक्टरचा महातपूरी फाट्यापासून भांबरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर समोरासमोर अपघात झाला. अपघातीची घटना घडतात ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून ट्रॅक्टर सह पळ काढला अपघाताची माहिती समजतात गंगाखेड पोलीस ठाण्याचे सपोनी शिवाजी सिंगनवाड, चालक सुग्रीम सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली . रावण भालेराव हनुमान इंगळे यांनी स्थानिक लोकाच्या मदतीने खाजगी रुग्णवाहीकेतून गंभीर जखमी ऊसतोड कामगार बाळू राठोड यास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. मयत ऊसतोड कामगार बाळू काशिनाथ राठोड यांच्या पश्चाता आई वडील पत्नी भाऊ दोन मुलं एक मुलगी असा परिवार आहे










