नवभारत कनिष्ठ महाविद्याल व श्रीमती जे बी के विद्यालय याचा विद्यार्थी तेजस सोनाळकर यास स्केटिंग स्पर्धेत गोल्ड मेडल =============== (दत्ता देशमुख याज कडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील नवभारत कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमती जेबीके विद्यालयाचा विद्यार्थी तेजस सोनाळकर याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजी नगर आणि रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा सप्ताह अंतर्गत.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये श्रीमती जे बी के नवभारत उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथील खेळाडू तेजस सोनाळकर याने गोल्ड मेडल प्राप्त केले. या यशाबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष संजय काबरा, संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर, संस्थेचे सचिव सत्यनारायण सोनी, संस्थेचे कोषाध्यक्ष सुभाष राठी, संस्थेचे जेष्ठ संचालक रामनारायण काबरा, संस्थेचे जेष्ठ संचालक तथा माजी अध्यक्ष सुरेश शेठ काबरा, संस्थेचे माजी सचिव तथा ज्येष्ठ संचालक प्रेमसुख काबरा, संस्थेचे संचालक तथा माजी सचिव प्रल्हाद टेंभुर्णीकर, संस्थेचे हैदराबाद निवासी संचालक राजीव काबरा, संस्थेचे संचालक दीपक काबरा, संस्थेचे संचालक माजी मुख्याध्यापक मधुकरराव निकम, संस्थेचे संचालक तथा माजी अधीक्षक विश्वनाथराव सांगोळे, संस्थेचे संचालक तथा उपप्राचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, संस्थेचे संचालक प्रदीप मुळे, संस्थेचे संचालक प्रदीप काबरा, संस्थेचे सर्व विश्वस्त, प्राचार्य नंदकुमार काळे, पंजाबराव सोळंके, धनंजय पुराने, प्राध्यापक सुनील बनसोडे, प्राध्यापक अरुण आहेर, प्राध्यापक कैलास जाधव, प्राध्यापक रामदास भांगे, प्राध्यापक गजानन धोटे, प्राध्यापक डॉक्टर आनंद जाधव, सखाराम बोरकर, विष्णू जाधव, कैलास भुतेकर, राजेश शेवाळे, रमेश इंगळे, भिवसन ससाने, संजय कुलकर्णी, राजेंद्र जगताप, रवींद्र मोरे, दिनकर उखर्डे, समाधान कांबळे, दत्ता उखर्डे, वासुदेव क्षीरसागर, आवटी मॅडम, पाटील मॅडम, भिलावेकर मॅडम, शेख मॅडम, कळंबे मॅडम, लंबे मॅडम, राजू डोमाळे, नागोराव देशमुख, डीजी तांबेकर, दीपक देशमुख, सर्व विद्यार्थी, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.







