निराधार योजनेतील विविध योजनेचा लाभ मिळावा म्हणून विविध संघटनानी एकत्र येऊन केले सत्याग्रह आंदोलन
गंगाखेड तालुका प्रतिनिधी चव्हाण युवराज
निराधार योजनेतील विविध योजनेचा लाभ मिळावा म्हणून विविध संघटनानी एकत्र येऊन केले सत्याग्रह आंदोलन
गंगाखेड : विविध सामाजिक संघटनानी व सामाजिक कार्यकर्त्यानी एकत्र येऊन निराधार योजनेती विविध योजना लाभ लाभार्थ्याना मिळावा म्हणून सोमवार रोजी दिवसभर तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून तहसील
कार्यलयात मागण्याचे निवेदन दिले.आंदोलन कर्त्यानी काही वेळ तहसीलदार याच्या दालनात ठिय्या मांडला होता.
अंपग,कॅन्सरग्रस्त,विधवा,अशा ६५ वर्ष वय झालेल्याना विनाअट संजय गांधी, इंदीरा गांधी योजनेचा लाभ देण्यात यावा,लाभार्थ्याला लावलेल्या जाचक अटी रद्द करा,दरमहा पाच हजार रूपये मानधन देण्यात यावे,ज्या लाभार्थ्याना पात्र केले याच्या कुटूबीयात शेत जमिन, अपत्य नसल्याचे लेखी माहिती द्यावी,काही गावात शंभरपेक्षा जास्त लाभार्थी पात्र आणी काही गावातील लाभार्थी संख्या अत्यंत कमी असा गावा गावात केलेला भेदभाव करू नये,लाभार्थ्याला पात्र, अपात्र,करण्यात आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता आहे.याची सखोल चौकशी करण्यात यावी. दोन वेळा मिटींग मध्ये झालेल्या निराधार योजनेतील लाभार्थ्यांकडून २१ हजार रूपयाची उत्पन्न प्रमाणपत्र मिळाले का? तसेच डिआरडी,अंपग,कॅन्सरग्रस्त असलेल्य लाभार्थ्यांना पात्र,अपात्र केले का याची माहिती देण्यात यावी.अशा विविध मागण्यासाठी सामाजिक संघटनानी व सामाजिक कार्यकर्त्यानी आणी लाभार्थी यानी तहसील समोर दिवसभर सत्याग्रह आंदोलन केले.या आंदोलनाच्या वेळी संतप्त झालेल्या आंदोलन कर्त्यानी तहसील कार्यालयात तहसीलदार याच्या दालनात ठिय्या मांडला होता. आदोलन दरम्यान तहसील कार्यालयात मागण्याचे निवेदन दिले.










