परमपूज्य श्री श्री १००८ स्वामी परमानंद गीरीजी महाराज यांचे गोळवाडी नगरीमध्ये आगमन.
वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे.
वैजापूर तालुक्यातील मुंबई नागपूर हायवे वरती गोळवाडी गावातील वाकचौरे वस्तीवर परमपूज्य श्री स्वामी जनार्दन स्वामी महाराज यांची कुटिया आहे.
तिथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री श्री १००८ स्वामी परमानंद गी रीजी महाराज यांचे प्रवचन झाले…
त्यांनी त्यांच्या प्रवचनात सांगितले की खरा तो एकची धर्म आहे माणसाने नेहमी सत्य वागावे. वाईट वळणाकडे जाण्यापासून स्वतःचे रक्षण करावे. गोमातेचे आई वडिलांचे सेवा करावी. धर्माची सेवा करावी. असे त्यांनी त्यांच्या प्रवचनातून जनतेला जीवन जगण्याचा संदेश दिला आहे.
प्रवचन संपल्यावरती वाकचौरे वस्तीवर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
श्री श्री स्वामी परमानंद गीरीजी महाराज यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील भावी फक्त तेथे परमपूज्य स्वामी परमानंद गिरीजी महाराजांचे प्रवचन ऐकण्यासाठी आले होते.
श्री श्री १००८ स्वामी परमानंद गिरीजी महाराजांचे स्वागत करताना श्री बाळनाथ श्रीधर वाकचौरे, बाबूलाल मांजरे, भीमराज पगार (सेक्रेटरी), मनोहर वाकचौरे, रामकिसन वाकचौरे व गावातील भक्तमंडळी उपस्थित होते.







