*बिबी लोणार येथे लोकनेते गोपीनाथ रावजी मुंढे साहेब यांची जयंती साजरी*
लोणार/बिबी प्रतिनिधी ब्रम्हानंद वाकोडे
लोणार तालुक्यातील बीबी येथे दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता गावकऱ्यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब ७५ वी जयंती साजरी करण्यात आली
बीबी येथील बस स्टँड परिसरामध्ये भव्य असे जयंतीचे आयोजन करण्यात आले असून तेथे मुंडे साहेबांची भव्य अशी प्रतिमा लावण्यात आली होती यावेळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या उत्साहाने हजर असून सर्वांच्या वतीने साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील सह पोलीस बांधव डॉक्टर बांधव जेष्ठ नागरिक हजर असून सर्वांनी साहेब मुंडे साहेबांना अभिवादन केले तर संध्याकाळच्या वेळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मिरवणूक रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून महिलांनी सुद्धा साहेबांना विनम्र अभिवादन केले यावेळी बिबी पोलीस स्टेशन ठाणेदार संदीप पाटील सह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून मिरवणूक शांततेमध्ये पार पडली













