*मराठ्यांचा संयम सुटला तर लय जड जाईल*
मनोज जरांगे पाटील यांचा मस्साजोग येथून इशारा
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच मराठासेवक संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला.
आरोपींना तात्काळ अटक व्हावी, प्रकरणाची CID चौकशी व्हावी व जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे यासाठी कालपासून मस्साजोग येथे शांततेत रास्तारोको सुरु आहे. आज मनोज जरांगे पाटील यांनी येथे भेट देऊन देशमुख परिवाराचे सांत्वन केले व आंदोलकांच्या मागणीला बळ दिले.
*विषय काय?*
मस्साजोग येथे अवादा कंपनीचा मोठा पवनचक्की प्रकल्प उभा राहत आहे. धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असलेले गावगुंड नित्याने हप्ते मागण्यासाठी येतात. मागील आठवड्यात या गावगुंडांनी कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण केली. यावेळी मस्साजोग येथील कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. त्यानंतर त्या गुंडांवर गुन्हा नोंद झाला, अटक झाली आणि दुसऱ्या दिवशी जामीनही मिळाला. बाहेर येताच या गुंडांनी प्रकरणाचा राग मनात धरून सरपंचांचे अपहरण करून खून केला. इतकी गुंडगिरी बोकाळली आहे. राजकीय वरदहस्तामुळे गुंडांना पोलीस आणि कायद्याची भीती राहिली नाही.
महाराष्ट्रातील बहुतांश गावांत मराठा बहुसंख्य आहे परंतु मराठा सहिष्णू आहे. कोणावरही अन्याय करीत नाही. सर्वांशी बंधुभाव जपतो. परंतु बीड जिल्ह्यात मुंडे परिवाराने ठराविक जातीचेच अधिकारी, पोलीस नेमून ठरावीक जातीच्या गावगुंडांना पोषक वातावरण बनवले आहे. गुंडगिरी, माफिया, हप्तेवसुली करणाऱ्यांना पाठबळ दिले आहे. विकास तर करता आला नाही. पण बीडचा बिहार बनवला आहे.













