महावितरणाचा “महा”घोटाळा! काम न करताच महावितरण अधिकाऱ्याने दिले ठेकेदाराला ६७लाख, ३ अधिकारी निलंबित.
वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे.
वैजापूर मध्ये महावितरणाचा “महाघोटाळा “उघडकीस आला
वैजापूर मध्ये महावितरण अधिकाऱ्याने ठेकेदाराला कामे न करताच ६७लाख रुपये दिले.
किरण इलेक्ट्रिक कंपनीने वैजापूर तालुक्यात विज जोडणीचे २५ कामे चक्क कागदावरच केली. तरीही ६७ लाख ५९ हजार५३९ रुपये इतके बिल महावितरण अधिकाऱ्याने ठेकेदाराला दिले.ही बाब समोर आल्यानंतर महावितरणच्या सहाय्यक अभियंता विरांग सोनवणे, कनिष्ठ अभियंता नितीन कुलकर्णी व देविदास कोतवाल यांना सह व्यवस्थापकीय संचालकांनी निलंबित केले आहे.
मात्र दिलेले पैसे अद्यापही परत आलेले नाही. त्यामुळे ती वसुली कधी होणार यावर प्रश्न निर्माण होत आहे.
सूत्राच्या माहितीनुसार, महावितरण कंपनीने२०२२ ते २०२३ या वर्षात किरण इलेक्ट्रिकला काम न करताच
६७ लाख५९ हजार ५३९ रुपये अदा करण्यात आले होते.
याप्रकरणी२५ सप्टेंबर २०२३ रोजी वैजापूर येथील कैलास बागुल यांनी महावितरणाचे अधीक्षक व महाअभियंता व मुख्य अभियंता यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी कंत्राटदार कंपनी आणि त्यांना बिल देणारे अभियंत्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे बागुल यांनी सह व्यवस्थापकीय संचलकाकडे तक्रार केली होती. त्यांनी तक्रारीची दखल घेऊन कामाच्या चौकशीसाठी जिल्हास्तरीय समिती नियुक्त केली.
या समितीने केलेल्या चौकशीत बागुल यांच्या तक्रारीत तथ्य आढळले होते. किरण इलेक्ट्रिकचे बिल थांबवण्याचे आदेश देऊन कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
आता किरण इलेक्ट्रिकवर गुन्हा दाखल करून त्यांना कळ्या यादीत टाकत दिलेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी बागुल यांनी केली आहे. दरम्यान आपल्यावरील आरोपाचे किरण इलेक्ट्रिकने खंडन केले असून, सर्व कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. या कामावर जाऊन खात्री करता येऊ शकते, असेही या कंपनीचे संचालक अशोक डांगे यांनी म्हटले आहे.










