माननीय आमदार संतोष भाऊ दानवे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी स्वच्छता मोहीम =============== (दत्ता देशमुख याकडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना सर्वात मोठी ग्रामपंचायत. टेंभुर्णी चे नाव जालना जिल्ह्यात नावलौकिक म्हणून प्रसिद्ध आहे. या टेंभुर्णी नगरामध्ये माननीय आमदार संतोष भाऊ दानवे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही स्वच्छता मोहीम दररोज असून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हनुमान चौक खालचे बस स्टँड, तसेच धनगर गल्ली स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली घेण्यात आली या स्वच्छता मोहिम. या स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषद सदस्य शालिग्राम मस्के पाटील, सरपंच गौतम मस्के, उपसरपंच शिवाजी मुळे, माजी उपसरपंच पाचे, भिकन भैया पठाण, शंकर भागवत, ज्ञानेश्वर उखर्डे, राजू खोत, संजय राऊत, गजानन राऊत, गजानन अंधारे, किशोर कांबळे, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायतचे अधीक्षक विक्रम उखर्डे, अजित भैया, दिगंबर भिसे, बाबासाहेब जमदाडे, सुनील भाले, स्वच्छता निरीक्षक गायमुखे, सर्व स्वच्छता कर्मचारी, उपस्थित होते. चौकट:- टेंभुर्णी चे सरपंच चे प्रतिनिधी गौतम दादा मस्के यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले ही मोहीम दररोज असून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असे स्वच्छ आणि सुंदर असं टेंभुर्णी करण्याचा ग्रामपंचायतचा मानस असून जाफराबाद तालुका सवे तर जालना जिल्ह्यात स्वच्छ सुंदर टेंभुर्णी करण्याचा आमचा मनोदय आहे. गावकऱ्यांनी टेम्भूर्णी ग्रामपंचायतला सहकार्य करावे असेही यावेळेस त्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ आवर्जून सांगितले. स्वच्छता ही जीवनाचा संस्कार असून या संस्कारातूनच टेंभुर्णी पुढे जाईल असा आमचा मानस आहे. **गौतम मस्के **










