मानवाच्या हक्काचे स्मरण व्हावे, यासाठी मानवी हक्क दिन साजरा केला जातो —— प्राध्यापक कैलास जाधव =============== (दत्ता देशमुख याकडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील नवभारत कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमती जे बी के विद्यालय मध्ये दहा डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवभारत कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा संचालक प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर हे होते. प्रमोद व्याख्याते म्हणून प्राध्यापक कैलास जाधव हे उपस्थित होते. त्यांनी मानवी हक्क दिनावर व्याख्यान देताना सांगितले जगात मानवी हनन होऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्राच्या संघटनेने मानवी हक्क दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. जागतिक मानव हक्क दिन दरवर्षी जगामध्ये 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मानवी हक्क दिन हे समानता, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठेच्या सार्वत्रिक बांधिलकीचा पुरावा आहे. हे पुढे म्हणाले की प्रतिबंधात्मक, संरक्षणात्मक, आणि चांगल्या संवर्धनासाठी परिवर्तनात्मक शक्ती म्हणून मानवी हक्क महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यासाठी मानवी हक्काचे स्मरण व्हावे यासाठीच मानवी हक्क दिन साजरा केला जातो. मानवी हक्क दिनाचा करार चळवळीच्या स्वातंत्र्यासारख्या अधिकाराशी संबंधित आहे. कायद्यासमोर समानता, निष्पक्ष चाचणीचा अधिकार, आणि निर्दोस्थेची धारणा, विचार विवेक आणि धर्म, स्वातंत्र्य मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य शांततापूर्ण सभा, सहवासाची स्वातंत्र्य, सार्वजनिक घडामोडी, या गोष्टी मानवाधिकारात येत असतात. आणि याचे स्वातंत्र्य सर्वांना असते. जगात मानवी हक्क दिन 30 सार्वभौमिक स्वरूपात आहेत. ज्यात जीवनाचे अधिकार, शिक्षणाचे अधिकार, संघटित करण्याचे अधिकार, इतर गोष्टी बरोबर न्याय वागणुकीची अधिकार, त्याची गोष्टी या 30 मूलभूत अधिकारात येतात. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी, जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक सुनील बनसोडे, जुनियर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर आनंद जाधव, प्राध्यापक अरुण आहेर, प्राध्यापक गजानन धोटे, वासुदेव क्षीरसागर, पाटील मॅडम, शेख मॅडम, भिलावे कर मॅडम, जाधव मॅडम, आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास दगडोबा तांबेकर, दीपक देशमुख, लंबे मॅडम, सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.










