*राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा*
(दत्ता देशमुख या कडून )
राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ. सुरेखाताई संजय लहाने तसेच या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी गौतम म्हस्के टेंभुर्णी सरपंच देशमाने सर ए पी आय टेंभुर्णी सुनील देशमुख ,विष्णू रोकडे ,संदीप परसने ,दत्ता कराळे ,जयश्री बोराडे, दिपाली भिसे, नसरीन सय्यद, सलमा शहा, शबाना शहा, कैलास कोरडे ,विनोद वरगने ,संदीप शिंदे हे होते. सर्वप्रथम या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांची हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एस .आर फलटणकर सर यांनी केले यानंतर शाळेचे अध्यक्ष सुयश लहाने यांनी सुद्धा सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये मुलांना सखोल मार्गदर्शन केले तसेच टेंभुर्णीचे सरपंच गौतम म्हस्के यांनी सुद्धा मुलांना संस्कृतीक कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले . या कार्यक्रमांमध्ये मुलांनी आपल्या कलागुणांना वाव दिला व चांगल्या प्रकारे नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी सोळुंके व शेख नवाज यांनी केले तसेच भक्ती धनवाई, सय्यद मुद्दतसिर, सय्यद खिजर ,भावेश कांबळे यांनी सुद्धा सूत्रसंचालनामध्ये सहभाग घेतला होता. तर आभार प्रदर्शन कृष्णा बनकर यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक विनोद उबरहंडे, अमोल तेलंग्रे, नवाज शेख, दत्तात्रय गाडेकर, विमल एस, भागवत लहाने, विनोद धवलीया, वनिता बोडखे, रोहिणी सोळुंके, वैष्णवी पिंपळे, सविता बकाल, स्नेहल रिंढे, सुनीता मोरे, अश्विनी दुनगहु, विमल मदन, प्रभाकर रोकडे, केशव पंडितकर, बाळू चव्हाण, अंकुश जोशी, इत्यादींची उपस्थिती होती.










