*रिसोड: शिवपुत्र, छ. शंभूराजेंची भव्य शोभायात्रा संपन्न*
…………………………………………
ज्ञानेशप्रसाद उपसंपादक वाशिम
…………………………………..
रिसोड येथे दि.14 मे 2025 रोजी, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जय हिंद समिती तर्फे, अद्वितीय योद्धा छत्रपती संभाजी राजांची जयंती साजरी करण्यात आली. या मिरवणुकीला सायंकाळी ६ वा. सुरुवात करण्यात आली असून, नवीन सराफ लाईन मधून भगवान महावीर चौक, अष्टभुजा माता चौक, आप्पास्वामी चौक, जय संताजी चौक, मधून शोभायात्रा हळू हळू कुठे हरकत होती, मिरवणुकी दरम्यान युवकांनी, संभाजी राजेंच्या पराक्रमाची वाखाणताना, वाघाच्या जबड्यात घालीन हात, मोजीन दात ही जात शूर मराठ्याची! असे छत्रपती संभाजी राजांच्या कर्तृत्वाचे गुणगान करत होते, नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर मोगलांशी लढल्याचे प्रात्यक्षिका सह इतरही चित्त थरारक कला सादर केल्या. त्याचप्रमाणे मुलींनी देखील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, इंग्रजांशी लढताना इंग्रज लेखक लॉरेन्स यांनी त्यांच्या विषयी काढलेले गौरवद्गार कॅथरिन द ग्रेट या {रशियन महाराणी} व एलिझाबेथ या {इंग्लंडच्या महाराणी} शी तुलना करून त्यांच्या पराक्रमी व दूरदृष्टीच्या शिस्तप्रिय शासनकर्त्या असल्याचे लॉरेन्स नावाच्या या इंग्रज लेखकाने म्हटले आहे. तथा सातारची समरांगणा राणी ताई तेलीन यांच्या शूर मर्दानी लढवय्या स्त्री-शक्तीचे सादरीकरण करून, मुलींनी आपली कला प्रदर्शित केली. ते आता आपण बघणार आहोत, मिरवणूक पुढे, संत रविदास चौकातून, मार्गक्रमण करीत करीत शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्री १० वा. सदर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. ही शोभायात्रा यात्रा यशस्वी करण्यासाठी उत्साही युवकांनी कठोर परिश्रम घेतले. ज्ञानेशप्रसाद उपसंपादक वाशिम










