विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट — प्राचार्य डॉ र.तु.देशमुख
(मुरलीधर उत्तमराव डहाके जाफराबाद तालुका प्रतिनिधी )जाफराबाद येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये आजीवन शिक्षण व विस्तार विभाग अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 विषयी स्वयंसेवकांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रा डॉ कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी बोलताना पाटील सर यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये झालेले बदल विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने उलगडून सांगितले ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी व भावी जीवनामध्ये समाजामध्ये वावरण्यासाठी एक सुसंस्कृत पिढी या धोरणातून कशी निर्माण होईल हे सांगण्याचा प्रयत्न केला.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ र तु देशमुख सर यांनी नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व सर्वांगीण विकासातून विद्यार्थ्यांना रोजगार असे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरेला अनन्यसाधारण महत्व देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ सुनिल मेढे, आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्रा डॉ शरद मोहरीर, प्रा मनिष बनकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मनिष बनकर यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा अनिल वैद्य, प्रा संजय साळवे, प्रा बी.बी. चव्हाण, प्रा डॉ सुदाम पाटील, प्रा डॉ निलेश भोसले, प्रा उत्तम वाघ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.







